आपलं शहरकारण

भाजपचे बडे नेते दबावाखाली, केंद्र सरकार देशातील वातावरण बिघडवत आहे – संजय राऊत

देशभरातून कृषिकायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी देखील आंदोलन करत आहे. सांगलीत स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे. यातचं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

उद्याचे आंदोलन हे जागतिक स्तरावर अभूतपूर्व आंदोलन होईल, दिल्लीतल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यराज्यात आंदोलन सुरू आहे, महाराष्ट्रात देखील शेतकरी एकवटला आहे. मुंबई सारख्या शहरात अजूनही कोविड गेलेला नाही, त्यामळे काळजी घ्यावी लागेल, त्यामुळे नवीन संकट मुंबईत पसरेल अशी चिंता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे, असे वक्त्यव्य संजय राऊत यांनी केले आहे.

गेल्या 60 दिवसापासून हे आंदोलन आहे, चर्चेच्या पहिल्याच फेरीत त्यांना प्रश्न सोडवायला हवा होता नंतर तर सरकारला करावंच लागणार आहे, इतके दिवस त्यांना ताटकळत ठेऊन सरकारला देशाचे वातावरण बिघडवायचे आहे का? असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. जय श्री राम बोलल्याने कोणाचे सेक्युरारीजम धोक्यात येत नाही, जय श्री राम हा कोणता राजकीय शब्द नाही, ती आमची अस्मिता आहे, असेही ते म्हणाले.

शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी लढत आहेत, पायपीट करून दिल्ली मुंबईत पोचलेत याचा अर्थ त्यांना भविष्याची चिंता सतावतेय, अशा वेळी सर्व राजकीय पक्षांनी आपले मतभेट विसरून एकत्र येणे आवश्यक आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना देखील वाटते की हे प्रश्न सुटावे मात्र त्यांना बोलता येत नाही, ते आतल्या आत गुदमरले आहेत,अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments