खूप काही

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरायला यूपी सरकारचा विरोध, म्हणाले…

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक राज्यातील शेतकरी पुढे आले आहेत. अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध दर्शवला जाणार आहे. हेच आंदोलन दाबण्यासाठी यूपी सरकारने हा निर्णय घेतला आहे. (UP govt orders no diesel for tractors as farmers gear up for Jan 26 rally)

ऊत्तर प्रदेश सरकारने सगळ्या जिल्ह्यातील डिझेल सप्लायर अधिकाऱ्यांना आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांना डिझेल न देण्याचे आवाहन केले आहे. देशातील हजारो शेतकरी त्यांच्या भागांमध्ये आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

प्रजासत्ताकदिनी प्रत्येक ठिकाणाहून केंद्राच्या कृषी कायद्याला निषेध दर्शवला जाणार आहे. जेव्हा उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाची खबर पसरली, तेव्हा शेतकरी नेते राकेश तिकैत यांनी शेतकऱ्यांना जिथे आंदोलन करणार तिथले रस्ते जाम करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला परवानगी दिली नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 2 महिने पूर्ण होत आलेत. दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमेवर 26 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.

दिल्लीच्या पथावर होणाऱ्या परेडमध्येदेखील शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च होणार असल्याचं म्हटलं जात आहे, त्याला शेतकऱ्यांकडून ‘किसान गणतंत्र परेड’ असे नामकरणदेखील करण्यात आलंय. आऊटर रिंग रोडवर आंदोलन करण्याची परवानगी मिळावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे, मात्र दिल्ली पोलिसांनी आंदोलनासाठी पर्यायी मार्ग सुचवले आहेत.

“शेतकरी ‘किसान गणतंत्र परेड’ 26 जानेवारीला काढणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आडवण्यासाठी जे बॅरिकेड्स लावले होते, ते काढण्यात येणार आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments