फेमस

राणा आणि साई पल्लवीच्या ‘विराट पर्व’ चे विराट पोस्टर रिलीज

‘बाहुबली’ फेम राणा दगुबाती आणि ‘फिदा’ मधून सर्वांच्या मनात उतरलेली अभिनेत्री साई पल्लवी हे दोघे आपल्याला वेणू उदुगुला दिग्दर्शित ‘विराट पर्वम’ या चित्रपटात लवकरच एकत्र दिसणार आहेत.

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचे नवीन पोस्टर रीलीज करण्यात आले आहे. यात साई पल्लवी आणि राणा दगुबाती प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.
हा चित्रपट 90 च्या दशकातील तेलंगणा राज्यातील नक्षलवादी चळवळीवर आधारित आहे. 5 वर्ष चित्रपटसृष्टीपासून दूर असलेले प्रियामणी देखील या चित्रपटातून पुनरागमन करीत आहेत. या चित्रपटासाठी साई पल्लवीने माजी टॉप कॅडर यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तसेच निवेता थॉमस देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

राणा आणि साई पल्लवी दोघेही चित्रपटात नक्षलवाद्यांची भूमिका करत असून सोबत राहुल रामकृष्णा, नंदिता दास, झरीना वहाब, नवीन चंद्रा, ईश्वरी राव अशी स्टारकास्ट असणार आहेत.

राणा दगुबती सध्या आपल्या ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. तर साई पल्लवी ही नागा चैतन्या सोबतच्या ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटात दिसणार आहे.

चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांना पसंत पडले असले तरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, हे पाहणे जास्त मजेशीर ठरेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments