आपलं शहर

नवाब मलिकांच्या जावयाची नेमकी चूक काय? एनसीबीकडून तातडीने अटक

सुशांत सिंगच्या मृत्युनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्या अनेकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातच आता ड्रग्स प्रकरणात समीर खान यांना एनसीबीने अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे समीर खान हे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत एनसीबीने अनेकांवर कारवाई केली आहे. त्यातच शनिवारी ‘मुच्छड पानवाला’ म्हणजेच करण सजनानी या ब्रिटिश अनिवासी भारतीयाला अटक केली होती. बड्या सेलिब्रिटीज आणि राजकारण्यांना तो ड्रग्स पुरवत असल्याचा आरोप त्याच्यावर होता. तसेच राहिला आणि शाईस्ता फर्निचरवाला या दलाल बहिणींनादेखील एनसीबीने अटक केली होती. तपासात या तिघांकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडल्याच समोर आलं होते.

चौकशीअंती ‘मुच्छड पानवाला’ चे सह मालक रामकुमार तिवारी यांना मंगळवारी अटक केली गेली.अधिक तपासात समीर खान यांचे नाव समोर आल्याने बुधवारी त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.” ड्रग्स प्रकरणाचे सर्व धागेदोरे आम्ही शोधून काढू “, असे एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले.

समीर खान कुठे अडकले?

ड्रग्जची तस्करी करणारा करण सजनानी याच्याशी समीर खान यांचे संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे, त्यामुळे समीर खान यांची तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत एक धक्कादायक बाब समोर आली. करन सजनानी याला समीर खान यांनी गुगल पेवरून तब्बल 20 हजार रुपये पाठवल्याचा खुलासा झालाय. हे पैसे नेमके कोणत्या कारणासाठी पाठवलेत, याची कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही, त्यामुळे याबाबतीत कोणती माहिती समोर येते, हे पाहणे गरजेचे आहे

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments