खूप काही

ट्रम्प गेले, बायडन आले, अमेरिकेच्या राजकारणात काय बदल झाले?

गेले काही महिने अमेरिकेत ट्रम्प आणि बायडन यांच्यात जो सामना चालू होता तो आज अखेर संपला. अमेरिकेतील निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडन विजयी झाल्यानंतर तात्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचंड थयथयाट केला. अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत भ्रष्टाचार झाला आहे, नाहीतर आपणच ही निवडणूक जिंकलो असतो, असं मतदेखील ट्रम्प यांनी बोलून दाखवलं होतं. त्यांनी बायडन यांचा विजय मान्य न करता त्यांच्या विरोधात ट्विट करायला सुरुवात केले होते. त्यातील काही ट्विटमुळे त्यांच्या समर्थकांनी युएस कॅपिटलवर हल्ला केला होता. परिणामी ट्रम्प यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी पायउतार होण्यास सहमती दर्शवली होती. (what has changed in American politics?)

जो बायडन यांनी बुधवारी एका ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यात अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यांनी देशाचे ऐक्य करण्याचे अभिवचन दिले. कमला हॅरिस यांनीही अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

अध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्या भाषणात, बायडन यांनी आपल्या “सहकारी अमेरिकन” लोकांना संबोधित केले. बायडन यांनी अमेरिकेच्या जागतिक आघाड्यांची दुरुस्ती करण्याचेही आश्वासन दिले आहे, त्यामुळे ट्रम्प यांच्या काळात ज्या देशांशी मैत्रीपूर्ण संबंध तुटले होते, ते पुन्हा जुळण्याची शक्यता आहे. हा अमेरिकेचा दिवस आहे. हा लोकशाहीचा दिवस आहे. हा ऐतिहासीक नूतनीकरण आणि संकल्प करण्याचा दिवस आहे, असंदेखील बायडन यांनी आपल्या भाषणादरम्यान मत मांडलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments