आपलं शहर

सर्वांसाठी लोकल कधी सुरू होणार; अखेर मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

गेले अनेक दिवस मुंबईकरांना एकाच गोष्टीची चाहूल लागलेली आहे, ती म्हणजे मुंबईतील लोकल Mumbai Local कधी सुरू होणार? याच प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी उत्तर दिलं आहे. (When will the start local for all; Finally, the Chief Minister made a revelation)

नववर्षाच्या सुरुवातीला मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी लोकल सुरू करण्याबद्दल माहिती दिली होती. लोकलमध्ये होणारी गर्दी आणि प्रवाशांचे नियोजन या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन लोकल सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अस मतही वडेट्टीवार यांनी मांडलं होतं.

अखेर या सगळ्याला बगल देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुंबई लोकल लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात काल (25 जानेवारी रोजी) मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरू करता येईल, यादृष्टीने विविध पर्यायांवर कालच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे लवकरच लोकलबद्दल निर्णय होणार असल्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments