कारण

“एकच चूक केलीत 2-4 झापड लगावल्या पाहिजे होत्या” असे का बोलले गृहमंत्री रेल्वे पोलिसाला?

रेल्वेतून मुंबईत प्रवास करत असताना रेल्वेकडून अनेक सूचना देऊन लोकांमध्ये जनजागृती केली जाते परंतु नवीन वर्षाच्या सुरवातीलाच एक किळसवाणा प्रकार घडला तरी सुद्धा रेल्वे पोलिसांच्या सावधगिरीमुळे 60 वर्षाचे प्रवासी यांना नवीन जीवदान मिळाले.

काय घडलं त्या दिवशी?

दहिसर रेल्वे स्टेशनवर 1 जानेवारी रोजी एक घटना घडली. दहिसरमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना एक प्रवासी लोकलखाली येता येता वाचला आहे. 11.30 ची वेळ होती एक 60 वर्षीय प्रवासी रेल्वे फाटक क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होते यावेळेस अचानक लोकल आल्याने त्यांनाकाय करावं सुचलं नाही आणि त्यांनी वरती येण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कार्यरत असलेले रेल्वे पोलीस सुजित कुमार निकम यांनी या इसमाला वाचवून नवीन जीवदान दिले.

सुजित कुमार यांनी 60 वर्षीय प्रवाशालासेवेवर असताना नवीन जीवदान दिल्याने आज त्यांचा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शासकीय निवासस्थानी सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.

20210103 134318

यावेळी बोलताना गृहमंत्री म्हणाले, 60 वर्षीय प्रवासी रूळ ओलांडताना त्यांना काही सुचले नाही पण सुजितकुमार असल्याने त्यांचा जीव वाचला. प्रवाशांनी अस काही करू नये प्रशासन पूर्ण काळजी घेत असत. योग्य ते सहकार्य करावे. पोलिसांचे मनोबल वाढण्यासाठी मी याअगोदर देखील सत्कार केले आहेत त्यामुळे त्यांना आमचा कायम पाठिंबा असेल. सुजित कुमार तुम्ही एकच चूक केलीत तुम्ही त्या प्रवाशाच्या दोन तीन कानाखाली झापड लगावायला हव्या होती. पुन्हा अशा घटना घडणार नाहीतच पण रेल्वे पोलीस देखील कायम सतर्क असतील.

मी सेवेवर रुजू असताना हा प्रकार दिसताच मी त्या प्रवाशाला हात देऊन वर घेतले पण प्रवाशांना विनंती करतो की रेल्वेने आखून दिलेले नियम सर्वांनी पाळायला हवेत. आणि आज माझा गृहमंत्र्यांडून सत्कार झाला याबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत.

– सुजितकुमार निकम, कॉन्स्टेबल

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments