फेमस

मकरसंक्रांतीला ‘ तिळगूळ घ्या,गोडगोड बोला ‘ असे का म्हणतात?

मकरसंक्रांत हा नवीन वर्षाच्या सुरवातीला येणारा पहिलाच मराठी सण आहे. दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला हा सण साजरा केला जातो. हिवाळा संपून पिके कापणीच्या हंगामाला सुरुवात होणार आहे, असा संदेश घेऊन जणू संक्रांत येते, पण संक्रांत का साजरी केली जाते, याचं शास्त्रशुध्द कारण तुम्हाला माहिती आहे का?

हा सण सूर्यदेवतेला समर्पित केला असून मराठी कॅलेंडरनुसार हा दिवस वर्षातला सगळ्यात छोटा दिवस मानला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे हा हिवाळा ऋतूचा शेवटचा दिवस मानला जातो. यानंतर दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाते. या दिवसानंतर सूर्य उत्तरेकडे झुकत असल्यामुळे या सणाला ‘उत्तरायण’ देखील म्हटले जाते.

या दिवशी सगळ्यांना लाडू आणि तिळगूळ देण्याची प्रथा आहे. थंडीमुळे शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी होते, मात्र तीळ आणि गूळ खाल्ल्याने ते पुन्हा वाढीस लागते. तीळ आणि गुळाचे लाडू देऊन ‘तिळगूळ घ्या, गोडगोड बोला’ असं म्हणून लहानांनी मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. आपापसातले वैर विसरुन बोलण्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी ही देवाणघेवाणीची परंपरा जनमानसात रुजून ठेवली जाते.

काय सांगते पुराण?

आपल्या पुराणानुसार संक्रांती देवीने शंकासुराचा याचं दिवशी वध केला होता. तसेच दुसऱ्या दिवशी तिने किंकासुराचा वध केला त्यामुळे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने लोक सूर्यदेवाची पूजा करतात व अध्यात्मिक भावना रुजण्यास मदत करतात. याचं दिवसात महिलांचे हळदीकुंकूसारखे समारंभदेखील आयोजित करण्यात येतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments