आपलं शहर

तसं असेल तर तुम्ही आजही मुंबई लोकलने प्रवास करु शकता, पालकमंत्र्यांनी दिल्या सुचना…

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली यासह राज्यभरात कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला असून देशातदेखील मागील 5 दिवसांपासून दर दिवसाला 20 हजारपेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत. ही दिलासादायक बाब असताना मुंबईकरांसाठी लाईफ लाईन अर्थात लोकल आतातरी सुरु होईल, या प्रतिक्षेत असणाऱ्या मुंबईकरांचा हिरमोड झाला आहे. लोकल सुरु होण्यासाठी मुंबईकरांना अजुन काही दिवस वाट पहावी लागणार आहे.असे संकेत सध्यातरी मिळत आहे. (you can still travel by Mumbai local today, the instructions given by the Guardian Minister)

पहिल्या लोकलपासून रात्रीच्या शेवटच्या लोकलपर्यंत सर्व सामान्यांनाही प्रवासाची मुभा द्यावी या प्रस्तावावर सरकार आणि रेल्वे प्रशासन विचार करत आहे. केंद्राकडे लोकल सुरु करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्यावर केंद्र सरकार गांभिर्याने विचार करत आहे. केंद्राने परवानगी दिली तर आताच्या आता रेल्वे सुरु करु, असे मत मुंबईचे  पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे जर सगळ्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली तर गर्दी वाढेल, त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये भर पडेल अशी भीतीदेखील त्यांनी वर्तवली आहे. दरम्यान पुढील आठवड्याच्या अखेरीस मुंबई लोकलची परवणगी  किंवा त्याबद्दल खुलासा होण्याची शक्यता आहे.

रात्री 10 ते  सकाळी 7 पर्यंत सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा?

सध्या मुंबई लोकलबाबात अनेक बातम्या समोर येत आहे, त्यातलीच एक बातमी म्हणजे रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासाची मुभा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. पाळीपाळीने सर्वांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली जाईल, मात्र त्यात वेळेनुसार अनेक टप्पे पाडले  जातील, अशी माहितदेखील सोमर येत आहे.

सध्या रेल्वेच्या एकूण फेऱ्यांपैकी 90 टक्के फेऱ्या सुरु आहेत. त्यात पश्चिम रेल्वेवर 1367 आणि मध्ये रेल्वे वर 1774 फेऱ्या सुरु आहेत. जर केंद्राच्या  रेल्वे बोर्डाकडून परवाणगी आली तर राज्य सरकारच्या समन्वायने सर्वसामान्यांसाठी पूर्ण क्षमतेने लोकल सुरु केली जाईल, असे मत मुंबई लोकल व्यवस्थापन कमिटीकडून म्हटले जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments