खूप काही

व्हाट्सअप डिलिट करताय? हे वाचून तुमचा निर्णय बदलू शकतो

मागील अनेक दिवसांपासून व्हाट्सअपच्या प्रायव्हसी पॉलिसीबद्दल अनेक समज गैरसमज निर्माण झाले आहेत. नवीन सेवांच्या अटींविषयी अनेक गोष्टी इतक्या वेगाने घडत आहेत की व्हाट्सअप कंपनीला या गोष्टींची दखल घेणे भाग पडले आहे.

अखेरीस व्हाट्सअपकडून एक स्पष्टीकरण देणारा मॅसेज प्रसारित करण्यात आला आहे. ज्यात नमूद केल्याप्रमाणे प्रायव्हसी पॉलिसीमुळे व्हाट्सअपवरील आपल्या वापरात बदल होणार नाहीत. आपण  आपल्या कुटुंबासह आणि मित्रांशी सुरक्षितपणे आणि खाजगीरित्या संवाद साधू शकणार आहेत, कारण :

•व्हाट्सअप आपले खाजगी संदेश, इतर माहिती पाहू शकत नाही किंवा आपले कॉल ऐकू शकत नाही, यासह फेसबुक देखील अशी कोणतीच गोष्ट करू शकत नाही.

चॅट्स, ग्रुप्स आणि कॉल एन्ड टू-एंड एन्क्रिप्टेड आहेत आणि नवीन सेवा अटींनी त्या सेवा बदलल्या नाहीत.

•तुम्ही कोणाला संदेश पाठवीत आहात किंवा कॉल करीत आहात, याविषयी कोणतीही माहिती किंवा लॉगइन्फो जतन केले जात नाहीत.

• व्हाट्सअप चॅट हे नेहमीच खाजगी असतात, एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतात.

•आपले कॉन्टॅक्ट व्हाट्सअप सर्व्हरवर अपलोड केले गेले आहेत, परंतु ते कधीही फेसबुकला जॉईन केले जात नाहीत.

•आपले व्हाट्सएप स्टेटस अद्याप खाजगी आहे, कारण तीथे एंड-टू-एंड एनक्रिप्टेड सिस्टीमचा वापर केला आहे. आणि आपण आपल्या प्रायव्हसी सेटिंग्जमधून निवडलेले लोकच त्यांना पाहू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या नवीन एफएक्यूमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. जर आपण बिजनेस अकाउंट वापरण्यास सुरुवात केली असाल, तर आपल्या फेसबुकवरील जाहिरातीच्या अनुभवावर परिणाम होऊ शकेल, अशीच संकल्पना लागू केली जाईल.

ही वैशिष्ट्ये पूर्णपणे पर्यायी आहेत. आपणास ते आवडत नसेल तर फक्त ही वैशिष्ट्ये वापरू नका म्हणजे तुमच्या सेटिंग्जमध्ये काहीही बदल होणार नाहीत.

अशा प्रकारे, व्हाट्सअपबद्दल सर्व माहिती आपणास देऊन, त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांचे  खंडन केले आहे. त्यामुळे आता तुमच्या मनात असलेला व्हाट्सअप डिलिट करायच्या निर्णयाचा पुनर्विचार करायला कोणतीच हरकत नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments