खूप काही

हसून हसून पोट दुखेल; युवराजने केला भन्नाट व्हिडीओ शेअर…

सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतीही विचित्र गोष्ट सहज अनेकांपर्यंत पोहोचते किंवा व्हायरल होते. असाच एका गोलंदाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गोलंदाज विचित्ररित्या ऑफस्पिन चेंडू टाकताना दिसत आहे.

युवराजने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. माजी स्पिन गोलंदाज हरभजनला टॅग करत या ‘भारतनाट्यम स्टाईल ऑफ स्पिन’ बद्दल तुमचं काय मत आहे, असा सवाल केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत सोशल मीडियावर 3 लाख 57 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

पाच वेळा फेरी मारुन केली गोलंदाजी
व्हिडिओमध्ये दोन संघ क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट खेळताना दिसून येतात. यावेळी, बॉल टाकण्यापूर्वी गोलंदाज रनअप घेताना आणि पाचवेळा फेरी मारून चेंडू टाकताना दिसून येतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युवराज सिंगने त्या प्रकाराला स्पिन गोलंदाजीची ‘भरतनाट्यम शैली’ म्हटले आहे.

सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या

या व्हिडिओला सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही मिळत आहेत. युवराजचा एक चाहता म्हणतो, ”हे पाहून मला ‘लगान’ चित्रपटाची टीम आठवली. भूरा याहून चांगली गोलंदाजी करेल.”

यावर एका वापरकर्त्याने चिडून सांगितले की, “गोकुळधाम प्रीमियर लीगचे नाव ऐकले आहे”.

दुसर्या वापरकर्त्याला तर ही व्हिडिओ पाहिल्यानंतर शक्तीमानची आठवण झाली! त्याने असे लिहिले आहे की ‘असं वाटतंय शक्तीमान गोलंदाजीला आला आहे’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments