कारण

Budget 2021 : अर्थसंकल्पाची रेल्वे आणि बुलेट एकदम सुसाट, मिळाला सगळ्यात जास्त निधी

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा झालेल्या 2021-22 या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प संसदेत सादर केले. या बजेटमध्ये निर्मला सीतारामण यांनी रेल्वे आणि बंदराच्या विकासासाठी 1.15 लाख कोटींची तरतूद जाहीर केली. यापैकी रेल्वे विकासासाठी 1.10 लाख कोटींचे बजेट केंद्र सरकारकडून रेल्वेला देण्यात आलं आहे. यामध्ये नॅशनल रेल्वे प्लॅननुसार 2030 पर्यंत विकास केला जाणार आहे. (In The budget trains and metro running fast; highest funding received in the budget)

भारतीय रेल्वेसोबतच सार्वजनिक परिवहन सेवेला प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यामध्ये रेल्वेशिवाय मेट्रो आणि परिवहन बस सेवा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. 18 हजार कोटींची गुंतवणूक मेट्रो आणि इतर परिवहन सेवेवर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments