खूप काही

Bank holiday complete list in March 2021: मार्चमध्ये बँका 11 दिवस राहणार बंद

नवी दिल्ली: फेब्रुवारी महिना लवकरच संपणार आहे.जर तुम्ही मार्च महिन्यासाठी बँकेशी संबंधित कोणतीही कामं करण्याचा किंवा या महिन्यातील कामे पुढे ढकलण्याचा विचार करत असल्यास पुन्हा एकदा विचार करा कारण पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्च मध्ये बँका कधीही बंद राहतील.

वेगवेगळ्या राज्यात या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असणार.देशातील सर्व बँकांना 11 दिवसाची सुट्टी असेल.काही राज्यात स्थानिक सणांच्या आधारे सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) हॉलिडे कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह एकूण 11 दिवस बँकांना सुट्टी असेल. यापैकी 5 मार्च, 11 मार्च, 22 मार्च, 29 मार्च आणि 30 मार्च रोजी बँकांना सुट्टी असेल. त्याशिवाय 4 रविवार आणि 2 शनिवारीही बँका बंद राहतील. 

IMPS, RTGS आणि NEFT सुविधा 24 तास सुरूच राहणार.RTGS मध्ये किमान 2 लाख रुपये ते कमाल कितीही पैसे एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात हस्तांतरित करता येतात. भारतात IMPS (Immediate Payment Service), NEFT (National Electronic Fund Transfer), RTGS (Real Time Gross Settlement) 24 तासांमध्ये कधीही करणे शक्य आहे.अशा प्रकारची सुविधा पुरवणारा भारत हा जगातील मोजक्या देशांपैकी एक आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेकडून एनईएफटी (NEFT) सुविधा 24×7 सुरू करण्यात आली होती. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments