कारण

2024 मध्ये 30 कोटी मत आणि 400 च्या पुढे जागा जिंकायच्याच, चंद्रकांत पाटलांचा इशारा

2014 ला भाजपाचे सरकार 17 कोटी मतं आणि 282 जागा जिंकून निवडून आलं. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत 22 कोटी मतं आणि 303 जागा असं भरगोस यश मिळवणून आपली जागा कायम ठेवण्यात भाजप यशस्वी झालं. आता भाजप सरकार हलचाल करतय 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीने.

2024 च्या निवडणुकीत भाजपाला देशात 30 कोटी मतं आणि 400 च्या पुढे जागा जिंकायच्या आहेत. असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप उद्योग आघाडीच्या बैठकीत केलं आहे.

काही कायद्यानंमुळे संसदेत पक्षाला तीन चतुर्थांश बहुमत असणं गरजेचं असत. त्यामुळे भाजपला 30 कोटी मतांची गरज लागणार आहे. उद्योग आघाडी सोबतच इतर सर्व आघाडयांनी ही पक्षाची मतं वाढवावी. आपण लोकांची मदत करत असताना त्यांना भाजपच्या कमळाशी जोडावे लागेल. असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं.

खरा राजकारणी तोच जो उद्याची तयारी आज पासूनच करतो. भाजपनेही 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीने पाऊल उचलण्यास सुरु केले आहे. नवनवीन योजना, सोई भाजप सरकार देशाला देतच आहे. परंतु अजूनही काही वर्ग पूर्व घटनामुळं मोदी सरकार विरुद्ध आहेतच. अशात 400 च्या पुढे जागा मिळवण्याची कामगिरी कशी पूर्ण होणार हे बघणं नक्कीच उत्सुकतेचं असणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments