फेमस

‘आ मेरे दिल मैं बस जा, मेरे आशिक़ आवारा’, शालूची प्रेमाची साद, कमेंटमधून चाहत्यांची बरसात…

मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक नागराज मंजुळेने त्याच्या पहिल्याच चित्रपटात महाराष्ट्राला एक गोड जोडी दाखवली ती म्हणजे जब्या आणि शालू.

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेला यशस्वी दिग्दर्शक नागराज मंजुळेने त्याच्या पहिल्याच चित्रपटात त्यांनी महाराष्ट्राला एक धमाकेदार जोडी दाखवली होती,ती म्हणजे जब्या आणि शालू…! या चित्रपटामधून जब्या आणि शालू महाराष्ट्रात खूप फेमस झाले,आशिक मुलांना आपल्या शालूला पटवण्यासाठी काळ्या चिमणीच्या राखेची आठवण पुन्हा झाली. आता जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडे आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करताना दिसतो तर शालूही तिचे अनेक वेगवेगळे पप्रोजेक्ट करताना दिसून येते.

अशा अनेक प्रोजेक्ट्सची माहिती शालू सोशल मीडियाच्या हॅण्डल अकाउंट वरून तिच्या चाहत्यांना देत असते. तसेच तिचे वेगवेगळे फोटो पोस्ट करुन शालू म्हणजे राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) आपल्या चाहत्यांमध्ये अपडेट असते. आता सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटोवर कमेंट तर येणारच ना… अशीच एक कमेंट राजेश्वरीच्या म्हणजे शालू च्या फोटोवर आली… आणि तिनेही ती कमेंट तितक्याच गमतीशीर पद्धतीने घेत त्या कमेंटला चांगलेच उत्तर दिलं.

राजेश्वरीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन तिचा सुंदरसा फोटो पोस्ट केला होता. ‘आ मेरे दिल मैं बस जा मेरे आशिक़ आवारा’, असं कॅप्शन देऊन तिने आशिक पोरांना प्रेमाची साद घातली. तरी बऱ्याच पोरांनी राजेश्वरीच्या या फोटोवर ‘कुणी तोडलंस.. जिंकलंस…ठार केलंस’ अशा खास कोल्हापुरी अंदाजमध्ये कमेंट केल्या… तर काहींनी मात्र शालूची चांगलीच फिरकी घेतली. अशाच फिरकी घेणाऱ्या चाहत्यांना राजेश्वरीने म्हणजेच आपल्या शालूने तिच्या त्याच गावरान अंदाजात उत्तर दिलं…

फोटो पोस्ट केल्यानंतर फोटोखाली शालूने सगळ्यांची लक्ष वेधून घेणारी कमेंट केली..ती कमेंट अशी होती की..“नारळ फेकून मारीन आज जर कुणी फालतू कमेंट केल्या तर…”, ही कमेंट करताना तिने नारळ हातात घेतलेला आणि पुन्हा एक फोटो पोस्ट केला… मग तर काय तिच्या फॅन्सनी तर कमेंट करण्यासाठी तिच्या अकाउंट वरती झूडुंब उडावली.

तिच्या एका चाहत्याने एक अत्यंत टिकाऊ कमेंट केली, शालू तू अंघोळ करुन ये… मी बघतो तोपर्यंत पोरांकडे… साहजिकच शालू यास उत्तर देणार हे त्याला माहिती होतं…परंतु या पोराला कमेंट करत शालूने सिक्सर ठोकला… पहिले तुम्हाला द्यावा का (पहिले तुमच्या डोक्यात नारळ हाणू का)… मी तशीच दिसते आणि आशिही मी छान दिसते… अशी कमेंट तिने केली.

दरम्यान, राजेश्वरीने काळ्या ड्रेसमध्ये एक सुंदरसा फोटो पोस्ट केला. त्या फोटोवर हजारेक कमेंट आल्या आहेत. काही कमेंटमधून चाहत्यांनी तिचं कौतुक केलंय.परंतु काहीही केले तरी शालूवरचं असलेलं चाहत्यांचं प्रेम काही केल्या कमी होत नाहीय इतकं खरं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments