आपलं शहर

Omkar Realtors Case: अभिनेता सचिन जोशी ह्याला इडीची अटक, विजय माल्याचा किंगफिशर बंगला घेतला होता विकत.

Mumbai- अभिनेता आणि व्यावसायिक सचिन जोशी ह्याला इडीने ओंकार रिअल्टर्सप्रकरणी अटक केली आहे.हे प्रकरण मुंबईच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या झोन-2 मध्ये रजिस्टर्ड आहे.

सचिन जोशीने 2017 मध्ये विजय मल्ल्याचा गोव्यातील किंगफिशर बंगला विकत घेतला होता. सचिन JMJ ग्रुपचे प्रमोटर आहेत. जे पानमसाला, परफ्यूम, दारू आणि इतर द्रव्य पदार्थांचा समावेश करतात. सचिन जोशी भारतीय प्लेबॉय फ्रेंचाईजचे मालक आहेत. मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी शर्मा त्यांची बायको आहे. ईडी ने समन्स बजावल्या नंतरही ते हाजिर झाले नाही म्हणून शनिवारी त्यांना ताब्यात घेतलं.

बॉलिवूड अभिनेता राज कपूर यांचे नातू अरमान जैन यांनाही टॉप्स ग्रुप प्रकरणी समन्स देण्यात आला होता पण खासगी कारण सांगत ते उपस्थित राहू शकले नाही.यापूर्वी ईडीने अरमान जैन यांच्या घरावर धाड टाकली होती. त्यानंतर बुधवारी त्यांना समन्स पाठवण्यात आला होता आणि गुरुवारी त्यांना ईडी कार्यालयात दाखल होण्यास सांगण्यात आलं होतं. आता ईडी त्यांना परत समन्स पाठवणार आहे.

या प्रकरणात अरमान जैनच नाव शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग याच्याशी मैत्री असल्याने पुढे आलं.शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगची याप्रकरणी दोनवेळा चौकशी झाली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments