आपलं शहर

जो जिता वही सिकंदर : मुंबई विमानतळावर आता अदानी समूहाची सत्ता

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची 23.50% हिस्सेदारी आता अदानी समूहाच्या मालकीची झाली आहे. विमानतळ खरेदीची प्रक्रिया आता प्रत्येक्षात सुरु झाली आहे. त्याच अंतर्गत GVK समूहाचा 50.50 टक्केच हिस्सा फक्त खरेदी करण्याचा बाकी आहे. (Adani purchase airport)

GVK समूह मागील 2 वर्षांपासून फार मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. त्यामुळे मुंबई विमानतळाची जबाबदारी आता त्यांना एकट्याने सांभाळता येणार नसल्याने हे पाऊल GVK समूहाला उचलावं लागत आहे. 

2019 पासूनच अदानी समूहाने विमानतळ खरेदीसाठीच्या हालचाली सुरु केल्या होत्या. परंतु त्यावेळेस GVK समूहाने अन्य ठिकाणावरून निधी उभा करून विमानतळ वाचवले होते. 

परंतु गोष्टी कुठे इतक्या सोप्या असतात?  कमवलेलं नेहमीच सोबत राहील हे गरजेचं नाही जो जास्त मेहनत घेईल तो पुढे जाईल आणि जे हवं ते मिळवेल हाच इथला नियम. मागील वर्षी GVK समूहा विरुद्ध चौकशी सुरु करण्यात आली आणि त्यानंतर मात्र GVK समूहाला विमानतळ विक्री करण्यावाचून दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहिला नाही.  याच संधीच्या शोधात असणाऱ्या अदानी समूहानेही उपलब्ध संधीचा फायदा करून घेत विमानतळ खरेदीची प्रक्रिया सुरु केली. आणि त्यातील पहिला हिस्सा आता त्यांच्या ताब्यात आहे. 

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या कंपनीत GVK समूहाचा 50.50%, बिडवेस्ट कंपनीचा 13.50%, एअरपोर्ट कंपनी ऑफ साऊथ आफ्रिका यांचा 10%, तर 26% हिस्सा भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आहे. सध्या अदानी एन्टरप्रायझेसने यांपैकी 23.50%  हिस्सा 1,685 कोटी रुपयांना पूर्ण खरेदी केला आहे. पुढील टप्यात GVK कंपनीचा 50.50% हिस्सा फक्त खरेदी करणे बाकी आहे. परंतु त्याआधी GVK वर असणारे 2,500 कोटींचं कर्ज अदानी समूह भागभांडवलात रूपांतरित करून विमानतळाचा महत्वाचा हिस्सा ताब्यात घटणार आहेत. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments