खूप काही

राज्यात कोरोना रुग्णांची वाढ, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच बोलल जातय. कारण तसे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही मास्क घालत नाही हे अत्यंत गंभीर आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल.” असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. औरंगाबाद मध्ये अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी कोरोना बाबत चिंता व्यक्त केली. “राज्यात कोरोनाच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनावर कोणीही राजकारण करू नये. अनेक नागरिक आणि ग्रामस्थ मास्क वापरत नाही हे घातक आहे.उद्या मुख्यमत्र्यांना भेटणार असून या बाबत चर्चा केली जाणार आहे.”

“शिवजयंती साधेपणाने साजरी केली जावी असा निर्णय घेतला होता तर काही जणांनी शिवजयंती वर बंधन कशाला? असा प्रश्न उभा केला होता.पण कोरोना आहे त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला यावर कोणी राजकारण करून लोकांना कोणी भावनिक करू नये”, अस अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि या बैठकीत काय निर्णय घेतले जाणार आहेत यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments