कारण

संजय राठोड स्वत: करणार प्रकरणाचा खुलासा; अजित पवारांचा खुलासा

महाराष्ट्रात सध्या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या प्रकरणात अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी भाजपकडून सातत्याने मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले जात आहेत. भाजपच्या चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केले होते. ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या त्यातील एक आवाज हा राठोड यांचा आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वाघ यांनी केली होती.

या प्रकरणात नाव आल्यापासून वनमंत्री संजय राठोड नॉट रीचेबल आहेत. ते कुठे आहेत हे कुणालाही माहिती नाही आहे. अशातच, काल संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राठोड गायब नाहीत..

संजय राठोड गायब नाही आहेत. ते गुरुवारी (18 फेब्रुवारी) या प्रकरणाचा खुलासा करणार आहेत अशी माहिती आहे, असे अजित पवार म्हणाले. तसेच, विरोधक बदनामी करण्यासाठी आरोप करत आहेत. जे असेल ते चौकशीतून सगळं पुढे येईल. तसेच या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही आहे, असे अजित पवार म्हणाले.

या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे हे आम्ही आधीच सांगितले आहे. पुणे शहर पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. काहींना त्यामध्ये ताब्यात घेतले आहे, असे अजित पवार म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments