कारण

Ajit Pawar Live : “आवाज वाजवून दाखवतो ” अजित पवारांचं फडणवीसांना थेट चॅलेंज…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध पक्षनेत्यांची चांगलीच हजेरी घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, अशोक चव्हाण यांच्यासह मविआचे इतर नेते उपस्थित होते.(Ajit Pawar’s suggestive statement on assembly election)

नाना पटोलांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर कोणाची वर्णी लागणार यावर सगळल्यांची चर्चा सुरु आहे. याचसंदर्भात अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी विरोध पक्षनेत्यांना थेट चॅलेंज दिलं आहे. विधानसभा अध्यक्षपदावरून जर कोणाला शंका वाटत असेल, तर त्यांनी अविश्वास ठराव मांडावा, असं थेट चॅलेंज अजित पवार यांनी दिलं आहे.

अजित पवार यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय की हिंमत असेल तर सरकारविरोधात विधानसभेत अविश्वास ठराव आणून दाखवा, आम्ही दाखवतो की आमचे किती आमदार आमच्यासोबत आहेत.

अध्यक्ष निवडीवरून सरकार पळ काढतंय का, असा सवाल विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केल्यावर अजित पवारांनी त्यांच्यावर आगपाखड केली आहे. जर त्यांना असं वाटत असेल तर त्यांनी विधानसभेत अविश्वास ठराव आणावा, मी आवाज वाजवून दाखवतो आमच्याकडे किती आमदार आहेत, यावरून संपूर्ण पत्रकार परिषदेत हस्या पिकला. (Ajit Pawar’s suggestive statement on assembly election)

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments