खूप काही

अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धनला “ब वर्ग” पर्यटनस्थळाचा दर्जा

राज्य शासनामार्फत अलिबाग (Alibag), मुरुड-जंजिरा (Murud-Janjira) आणि श्रीवर्धन (Shrivardhan) या रायगड जिल्ह्यातील तीन पर्यटनस्थळांना “ब वर्ग” पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एक ट्विट करत ही घोषणा केली. मुंबई, पुणे या शहरांपासून रायगड जिल्हा जवळ आहे आणि इथे येणार्या पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन आदित्य ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला आहे.

“ब वर्ग” पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे या ठिकाणांना आता विविध सोयी सुविधा मिळणार आहेत. या निर्णयामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.

ऐतिहासिक अलिबाग
अलिबागला विस्तृत समुद्रकिनारा त्यासोबतच निर्सगाचे वरदान लाभलेले आहे. नारळी-फोफळी, सुपारीच्या बागांनी अलिबाग नटलेले आहे. अलिबागला छत्रपती शिवरायांनी बांधलेला कुलाबा किल्ला आहे, शिवरायांचे आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रेंची समाधी, काशी विश्वेश्वर मंदिर, हिराकोट किल्ला, खांदेरी उंदेरी किल्ले यांसरखी असंख्य ऐतिहासिक ठिकाणं आहेत.

अलिबागसोबतच मुरुड-जंजिराही तितकाच प्रसिद्ध आहे. समुद्रात असणारा पद्मदुर्ग, श्री कोटेश्वरी मंदिर, ऐतिहासिक मुरुड-जंजिरा जलदुर्ग आणि फणसाड अभयारण्य यांसारख्या पर्यटनस्थळांनी मुरुड-जंजिरा शहर नटलेले आहे.

दरम्यान, गोव्याच्या धर्तीवर कोकणातील समुद्रकिनारी बीच शॅक (Beach Shack) उभारण्यात येणार आहेत. अलिबागेतील वर्सोली व श्रीवर्धन मधील हरिहरेश्वर समुद्रकिनारी हे बीच शॅक उभारण्याचा शासनाचा मानस आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments