कारण

Amit shah : कोकणात येऊन धन्य झालो, अमित शाहांची मोठी घोषणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. भाजप खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा ड्रीम प्रॉजेक्ट असलेल्या लाईफटाईम मेडिकल कॉलेजचे उद्घाटन आज शहा यांच्या हस्ते पार पडले. कोकणात एक मेडिकल कॉलेज असावं या उद्देशाने गेली काही वर्ष नारायण राणे ज्या दिवसाची वाट बघत होते, त्या लाईफटाईम मेडिकल कॉलेजचे स्वप्न आज सत्यात उतरले आहे.

अमित शहा यांचा आजचा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातोय. याचे कारण, कालंच नारायण राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केलेले वक्तव्य. राणे यांनी काल, “अमित शहांच्या पायगुणाने राज्यातील ठाकरे सरकार जावो” अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात सत्तानाट्य रंगणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राणेंवर अन्याय होणार नाही
भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर लोकार्पणाला उपस्थित नेते चांगलेच खूष असल्याचे पहायला मिळाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राणेंची तारीफ केली. “नारायण राणेंना त्यांच्या राजकीय जीवनात अनेक अन्याय सहन करावे लागले. त्यांनी त्या अन्यायाला वाचा फोडत भविष्याचा विचार करून पुढची पावले टाकली. त्यामुळेच त्यांची आजवरची राजकीय कारकिर्द ही खूप हिरतीफिरती झाली आहे. मला पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्या पक्षात राणेंवर अन्याय झाला तर? मी सांगतो, आम्ही त्यांच्यावर अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मान करू. नारायण राणेंना कसं सांभाळायचं आणि सन्मान करावा ते भाजपाला चांगलं माहिती आहे.” (Amit Shah speech at Narayan Rane Lifetime medical college opening).

या मातीला स्पर्श करून धन्य झालो
“सर्वात आधी या भूमीवर पाय ठेवून, या मातीला स्पर्श करुन धन्य झालो. या भूमीकडून प्रचंड चेतना मिळते. या भूमीने संपूर्ण देशाला स्वदेशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी जीव देण्याचे संस्कार दिले आहेत. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची भाषा करत संपूर्ण देशाला चेतना दिली. तेव्हापासून सुरू झालेली ही यात्रा आज पंतप्रधान मोदींपर्यंत सुरू आहे,” असे शहा यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी हे तीनचाकी ऑटोरिक्षा सरकार
अमित शहा यांनी आपल्या भाषणात राज्यातील महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रामध्ये तीनचाकी ऑटोरिक्षा सरकार बनले आहे आणि तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेनं जात आहेत. महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अनादर करीत केवळ सत्तेच्या लालसेपोटी हे सरकार स्थापन करण्यात आले आहे, असे यावेळी शाही म्हणाले.

तर शिवसेना उरली नसती
सिंधुदुर्ग येथील आपल्या भाषणात अमित शहा शिवसेनेवर चांगलेच बरसतांना पहायला मिळाले. ते म्हणतात मी बंद खोलीत त्यांना वचन दिले. मात्र मी बंद खोलीत कधीच वचन देत नाही. जी काही चर्चा असेल ती सरळ जनतेसमोर करतो. शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपदाची कोणतीही चर्चा झाली नाही. तुम्ही पंतप्रधान मोदींची मोठमोठी पोस्टर्स लावून त्यांच्या नावाने मते मागितली. मात्र नंतर दगाबाजी केली. जर आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो तर आज महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती, असे टीकास्त्र शहांनी शिवसेनेवर सोडलं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments