खूप काहीफेमस

निष्ठावान, कार्यक्षम, दूरदर्शी; अँडी जैसी घेणार अ‍ॅमेझॉनच्या सीईओची जागा…

15 वर्षांच्या कठोर परिश्रम आणि चिकाटीने अमेझॉन ई-कॉमर्स कंपनीला अत्यंत फायदेशीर टेक कंपनीमध्ये बदलणारे एंडी जैस्सी यांनी क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर मार्केटमध्ये एक चांगले काम केले आहे.

एंडी जैसी ऍपल (Apple) आणि मायक्रोसॉफ्ट (microsoft) नंतर अमेरिकेतील तिसरी मोठी कंपनी असणाऱ्या अमेझॉनचे सीईओ बनणार आहेत. कंपनीच्या 27 वर्षाच्या इतिहासात जेफ बेजोसनंतर जेसी दुसऱ्यांदा सीईओ असणार आहेत.

53 वर्षांचे जेसी ‘एस-टीम’ नावाच्या एका विशेष गटाचा भाग होते. लॉन्च झाल्यापासून बेझोसने 2016 मध्ये AWS चे सीईओ म्हणून अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसची घोषणा केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बेझोस यांनी आपल्या एका कॉलममध्ये स्पष्टपणे लिहिले होते की त्यांची जागा घेण्यासाठी जेसी योग्य आहे.

1990 मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आणि 1997 मध्ये हार्वर्ड बिस्नेस स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर जेसी हे सरळ अमेझॉनमध्ये कार्यरत होते आणि तेव्हापासून त्यांनी अमेझॉनची साथ नाही सोडली. जैसी म्हणाले की ” हार्वर्डमध्ये 1997 ला पहिल्या शुक्रवारी मी माझी शेवटची परीक्षा दिली आणि सोमवारी मी अमेझॉनमध्ये जॉइन झालो, सुरुवातीला मला माझं काम काय असेल ते पण माहित नव्हतं.”

2006 मध्ये AWS सुरू केल्यापासून क्लाउड स्टोरेजवर जोर देण्यात आला. सुरुवातीच्या काळात हे काम लहान टेक कंपन्या आणि डेव्हलपर्सच्या टीमने सुरू केले होते. पण हे पाहिल्यावर जैसने या व्यवसायाला मोठा फायदेशीर व्यवसाय बनविला. त्यानंतर बर्‍याच कंपन्यांनी स्वतःचे स्टोरेजदेखील तयार केले नाहीत, ते अमेझॉनवर अवलंबून होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments