खूप काहीकारण

आमच्या घरचा माणूस गमावला; बंगल्यावरील सुरक्षा गार्डच्या मृत्यूनंतर गृहमंत्री अनिल देशमुखांनी व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे कायमंच पोलिस बांधवांसोबत आपुलकीने वागत असतात. गृहमंत्री, पोलिसांचे कुटुंबप्रमुख या नात्याने ते पोलिसांच्या सर्व चांगल्या वाईट प्रसंगात त्यांच्यासोबत असतात हे गेल्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सुरक्षा गार्ड म्हणून तैनात असलेल्या पोलिस अंमलदार संजय नारनवरे यांचा बुधवारी रात्री नांदगाव फाटा परिसरात बाईक अपघातात मृत्यू झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

माझ्या नागपूरच्या निवासस्थानी बंगला सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असणारे पोलिस अंमलदार संजय नारनवरे यांचे अपघातात दु:खद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत, असे देशमुख म्हणाले. तसेच, संजय यांच्या जाण्याने आम्ही आमच्या घरातील एक सदस्य आज गमावला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments