कारण

Nitin Raut : उर्जामंत्र्यांची मोठी घोषणा, थकबाकी वसुलीनंतर 100 युनिटपर्यंतची वीजबिले माफ

कोरोना महामारीमुळे लागलेल्या लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ केले जाईल अशी घोषणा राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. त्यानंतर काहीच दिवसांत राऊतांनी यु-टर्न घेतला. कोणत्याही परिस्थितीत वीजबिल माफ करण्यात येणार नाही असे वक्तव्य राऊतांनी केल्याने ते वादात सापडले होते. विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात आंदोलने केली. मनसे, भाजप यांनी वीजबिल माफ करण्यासाठी आंदोलने केली. हे सर्व झालेले असताना उर्जामंत्र्यांनी आता एक नवीन घोषणा केली आहे.

थकबाकी वसुलीनंतर 100 युनिटपर्यंत वीजबिल माफ

उर्जामंत्री झाल्यानंतर मी 100 युनिटपर्यंत वीज मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी एक उच्चस्तरीय समितीदेखील गठित करण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीमुळे समितीची एकही बैठक होऊ शकली नाही. कोरोना काळात महावितरण वीज देयकांची थकबाकी 71 हजार कोटींच्या वर गेली आणि त्यामुळे महावितरणला आर्थिक तोटा सहन करावा लागला, असे उर्जामंत्री म्हणाले.

महावितरणला आर्थिक तोटा सहन करावा लागला असल्यामुळे सध्यातरी 100 युनिटपर्यंत वीज मोफत देणे शक्य नाही. मात्र महावितरणकडून थकबाकी वसुलीचे काम पुर्ण झाले की या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी उर्जामंत्री म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments