फेमस

कपूर फॅमिलीचा आणखी एक माणूस पडद्या आड; ‘राम तेरी गंगा मैली’ मधून झाला होता प्रसिद्ध

ये साथ फेरो का बंधन नहीं है, वचन का बंधन है, जो मुझे मिटा तो सकता है लेकीन तोड नही सकता

राम तेरी गंगा मैली चित्रपटामधील हा डायलॉग बोलणारे अभिनेते राजीव कपूर यांचं आज (9 फेब्रुवारी) निधन झाले. कपूर कुटुंबातील 90च्या दशकातले मोठे कलाकार गेल्याने सर्व बॉलिवूडमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे.

बॉलिवूड अभिनेते राजीव कपूर हे 58 वर्षांचे होते. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक असलेले राजीव कपूर हे दिग्गज राज कपूर यांचे सर्वात धाकटे रत्न आणि रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांचे भाऊ होते. राजीव कपूर यांच्या निधनाची बातमी वहिनी नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर त्यांचा फोटो पोस्ट करत दिली. चेंबूर येथील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना त्वरित इनलॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण वेळ निघून गेल्याने याच रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. (Rajiv kapoor passed away)

अत्यंत दुःखद बातमी. राजीव (चिंपू) कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले,” असे ट्विट बॉलीवूडचे व्यापार विश्लेषक कोमल नहता यांनी केले.

1983 मध्ये एक जान है हम या चित्रपटातून राजीव यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ‘राम तेरी गंगा मैली’ या ब्लॉकबस्टर सिनेमातून त्यांना खरी ओळख मिळाली होती. बॉलीवूड मधला त्यांचा शेवटचा चित्रपट झिम्मेदार हा होता. ‘प्रेम ग्रंथ’ आणि ‘आ अब लौट चले’ यासारख्या इतर होम प्रोडकशनचेही त्यांनी समर्थन केले. बॉलीवूड मध्ये राजीव हे चिंपू नावाने देखील ओळखीले जात होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments