खूप काही

तरुणीचे आत्महत्येचं कुळ, बड्या नेत्यांचं मूळ, लवकर मोठा खुलासा…

रविवार दिनांक 7 फेब्रुवारी 2020 रोजी हडपसर परिसरात एका 22 वर्षीय तरुणीने  तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मात्र भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने ही हत्या की आत्महत्या याचा तपास करण्याची मागणी केली आहे. या संधर्भातील तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विदर्भातील एका नेत्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या केली असल्याचा दावा समज मध्यामातून केला जातोय.

मूळची बीड जिल्ह्यातील परळी येथील असलेली 22 वर्षीय पूजा चव्हाण हिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी मध्यरात्री पुण्यातील महम्मदवाडी येथील हेवन पार्क येथे घडली.

आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेल नाही. मात्र सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहे

पुणे शहरातील महिला आघाडीच्या अर्चना पाटील यांनी या प्रकरणाचा तपास लवकरात लौलवकर केला नाही तर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. संबंधित दोषी गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी अशीही मागणी केली आहे

पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी ज्या नेत्याचा संबंध जोडला जात आहे, त्याच्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहे.

कोणत्याही परिस्थितीत लॅपटॉप, मोबाईल ताब्यात घे, हे प्रकरण अजून वाढता कामा नये अशा सूचना कोणतीतरी व्यक्ती प्रकरण दाबण्याच्या अनुषंगाने देत असल्याचे ऑडीओ क्लिपमधून समोर येत आहे. या ऑडियो क्लिप बाहेर कशा आल्या यावरही अनेक चर्चा सुरू आहे

पूजा चव्हाणच्या फेसबुकवर एका मंत्र्याचा फोटो होता, त्यावरही चर्चा चालू आहे. आत्महत्येपूर्वी पूजा चव्हाण इस्पितळात दाखल झाली होती का? होती तर कशासाठी दाखल झाली या सगळ्याची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments