आपलं शहर

Navi Mumbai Apmc : एपीएमसी मार्केटमध्ये पुन्हा होणार हॉटस्पॉट, धक्कादायक माहिती समोर…

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये पुन्हा एकदा सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले, याची दखल घेऊन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश बाजार समितीच्या सचिवांना दिले आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी बाजारात असलेले किरकोळ व्यवसाय तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये किरकोळ व्यवसाय मोठा प्रमाणात होत असून त्याठिकाणी मोठी गर्दी वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांना नो मास्क नो एंट्री करण्यात आली आहे, घाऊक विक्रेत्यांना टप्प्याटप्प्याने प्रवेश द्यावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत, परंतू बाजार समिती प्रशासनाने पालिका आयुक्त अभिजित बांगर आणि मुख्यमंत्रच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

आजही फळ आणि भाजीपाला बाजाराच्या आवारात गर्दी पाहायला मिळते. घाऊक बाजारात व्यापाऱ्यांनी आपल्या गाळ्यांमध्ये आणि पॅसेजमधील जागा किरकोळ व्यपारासाठी परप्रांतीयांना दिली आहे, त्यामुळे बाजार आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अनेकांच्या तोंडावर मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंगचा कुठलाही अवलंब केलेला दिसून येत नाही, अशाने कोरोनाचा फैलाव वेगाने वाढतो आहे , म्हणून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments