खूप काहीएकदम जुनं

पावनगडावर सापडला तोफगोळ्यांचा साठा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक गडकिल्ले उभारले. आजही ते गडकिल्ले दिमाखात उभे आहेत. पावनगड हा त्यातीलच एक गड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड बांधला. पावनगड हा पन्हाळा गडाचा संरक्षक गड म्हणूनही ओळखला जातो. याच पावनगडावर तोफगोळ्यांचा एक मोठा साठा सापडला आहे.

पावनगडावर दिशादर्शक फलक लावण्याचे कार्य सुरू होते. हे काम चालू असताना तेथील व्यक्तिंना हे तोफगोळे सापडले अशी माहिती इथल्या स्थानिकांनी दिली. हे सर्व तोफगोळे शिवकाळातील असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

पावनगड हा पन्हाळा गडाच्या अगदी शेजारी चार किलोमीटर अंतरावर आहे. हा गड रेडेघाट परिसरात वन विभागाच्या ताब्यामध्ये आहे. गडावर वनविभाग आणि “टीम पावनगड” संघटनेकडून काही विकासकामे सुरू आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून आसपासच्या महत्त्व असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक संघटनेकडून लावण्यात येत आहेत.

कसे सापडले तोफगोळे

दिशादर्शक फलक लावण्यासाठी खड्डा खोदण्यात येत होता. त्यावेळी गडावरील एका मंदिराजवळ या तोफगोळ्यांचा साठा आढळून आला. 100 ते 200 ग्राम वजनाचे चारशे तोफगोळे सापडल्याची माहिती आहे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार येथे आधी दारूगोळा ठेवण्यासाठी कोठार होते. या घटनेवरून गडावर आणखी तोफगोळे आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, तोफगोळ्या हा भलामोठा साठा सापडल्यामुळे सर्वच शिवप्रेमींच्या मनात अभिमान आणि आनंद व्यक्त होत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments