खूप काही

डॉन अरुण गवळीची प्रकृती गंभीर; उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल

नागपूर कारागृहात कैद असलेला प्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (डॅडी) याला चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्याला कोविडची लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे त्याची कोविडची चाचणी करण्यात आली आणि त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. (Arun Gawli detected COVID-19 positive)

दरम्यान, आता अरुण गवळीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्यावर नागपूर कारागृहातच उपचार सुरू होते. मात्र, आता प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी गवळीला नागपूर येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे.

नागपूर कारागृहातील रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारांचा फारसा उपयोग गवळीवर झाला नाही. त्यानंतर आज सकाळी प्रकृती जास्तच गंभीर झाल्यामुळे त्याला नागपूर येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे.

दरम्यान, अरूण गवळीला जुलै महिन्यातच 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यात आली होती. ती रजा दिलेल्या मुदतीच्या काही दिवस आधीच तो कारागृहात परत आला होता. नंतर पत्नीच्या आजारपणाचे कारण देत डॅडींना 45 दिवसांची रजा मंजूर करण्यात आली होती. परंतू, लॉकडाऊनचे कारण देत त्याने पुन्हा पॅरोलची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता आणि त्यानुसार न्यायालयाने पुन्हा एकदा अरुण गवळीला पॅरोल मंजूर केला होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments