खूप काही

दगडी चाळीच्या डॅडींना कोरोनाची लागण

नागपूर कारागृहात असलेला प्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (डॅडी) याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येते आहे. सध्या त्याच्यावर नागपूर कारागृहातच उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याला कोविडची लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे त्याची कोविडची चाचणी करण्यात आली आणि त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्यांच्या सोबतच्या इतर काही कैद्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजले आहे. (Arun Gawli detected COVID-19 positive)

दरम्यान, अरूण गवळीला जुलै महिन्यातच 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यात आली होती. ती रजा दिलेल्या मुदतीच्या काही दिवस आधीच तो कारागृहात परत आला होता. नंतर पत्नीच्या आजारपणाचे कारण देत डॅडींना 45 दिवसांची रजा मंजूर करण्यात आली होती. परंतू, लॉकडाऊनचे कारण देत त्याने पुन्हा पॅरोलची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता आणि त्यानुसार न्यायालयाने पुन्हा एकदा अरुण गवळीला पॅरोल मंजूर केला होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments