आपलं शहर

धक्कादायक! विरारमध्ये 8 महिन्यांच्या चिमुकलीला विकण्याचा प्रयत्न…

विरारमध्ये एक धक्कादायक आणि लाजीरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. एका टोळीने अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकलीला विकण्याचा प्रयत्न केला आहे. या टोळीत 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, विरार पोलिसांनी या टोळीला अटक केली आहे. त्या चिमुकलीला पोलिसांनी अधेंरीतील एका बाल संगोपन केंद्रात पाठवले आहे. (Shocking! Attempt to sell 8-month-old girl child in Virar)

आई कोरोनामध्ये गेली, बापही सोडून गेला
या चिमुकलीच्या आईचे लॉकडाऊनच्या काळात निधन झाले आहे आणि तिचे वडीलही तिला सोडून गेले असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर चिमुकलीला तिचे नातेवाईक सांभाळत होते. मात्र या चिमुकलीच्या विक्रीची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या चार आरोपींना न्यायालयाने 16 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, विरार पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments