कारण

शरजील उस्मानीला महाराष्ट्राबाहेर पळवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं, आशिष शेलारांचा टोला

भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर घणाघात केला आहे.

शरजील उस्मानीला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर पळवण्याचं काम, त्याला पळून जाण्यासाठी मदत करण्याचं काम सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीने केलंय. हे त्यांच पाप आहे. आता त्याला दिल्यानंतर आणि दोन दिवस भाजपने आंदोलन केल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करु, हे म्हणणं म्हणजे पश्चात बुद्धी आहे. शिवसेनेने या पश्त्यात बुद्धीच पाप हिंदूंना सडलेल्या म्हणणाऱ्या व्यक्तीला वचवण्याचं पाप का केलं हे जनतेसमोर मांडव. अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

शिवसेनेनं नागपूरमध्ये जाऊन हिंदुत्वावचा क्लास लावावा. खाली डोकं वर पाय अशा प्रकारची अवस्था शिवसेनेची झाली आहे. परदेश कनेक्शन काय आहे हे, संजय राऊत यांनी जनतेसमोर मांडाव, असा टोलाही आशिष शेलारांनी लगावला आहे.

अमिबालासुद्धा लाज वाटावी एकाच वेळेला चार वेगवेळ्या पद्धतीने चालणारा पक्ष हा अमिबा रुपी पक्ष शिवसेना आहे. अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे. पालिकेच्या बजेटमधून केवळ जनतेची बनवाबनवी केली आहे. असंही मत शेलारांनी मांडलं आहे.

(Authorities try to smuggle Sharjeel Usmani out of Maharashtra, says Ashish Shelar)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments