खूप काही

रामदेव बाबांच्या “कोरोनील”ला महाराष्ट्रात नो एण्ट्री..

पतंजली या कंपनीने तयार केलेल्या कोविडवर प्रभावी असल्याची जाहिरात केलेल्या कोरोनील या औषधावरून वाद निर्माण झाला आहे. Indian Medical Association (IMA) ने कोरोनील विषयी काही प्रश्न उपस्थित केलेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोनील या औषधाला महाराष्ट्रात विक्री करण्यास परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. (Ban on Patanjali’s Coronil in Maharashtra)

“पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्धकीय चाचणीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रश्न उपस्थित केले असून, WHOने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणे आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणे योग्य नाही,” असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

WHO, IMA आणि इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या Coronil औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments