कारण

…तर पक्षातून हकालपट्टी केली असती, काँग्रेस नेत्याची शिवसेनेवर टीका

आज (4 फेब्रुवारी रोजी) मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा कारभार चव्हाट्यावर मांडला आहे. रस्त्यावरील फेरीवाल्यांकडून परस्पर पैसे घेतल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यावरच काँग्रेसचे नेते आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap to head Mumbai Congress) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. (Mumbai Congress President Bhai Jagtap criticizes Shiv Sena)

मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाई झालीच पाहिजे, काँग्रेसमधील एखाद्या नेत्याने फेरीवाल्यांकडून असे पैसे उकळले असते, तर मी त्याची पक्षातून हकालपट्टी केली असती, असं मत भाई जगताप यांनी मांडलं आहे.

मुंबईत गुरुवारी (4 फेब्रुवारी रोजी) पत्रकारांशी बोलताना भाई जगताप यांनी हे विधान केलं आहे. यावेळी मुंबई पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं वक्तव्यही केलं आहे. येत्या मुंबई पालिकेच्या 227 जागा स्वबळावर लढणार असल्याचं मतही त्यांनी त्यांनी व्यक्त केलं.

शिवसेनेची सत्ता असलेल्या आणि काँग्रेस विरोधीपक्ष असलेल्या मुंबई पालिकेच्या बजेटवरही भाई जगताप यांनी विधान केलं आहे. पालिकेचं बजेट फुगवून सांगितल्याचा आरोपही जगताप यांनी केला आहे. 500 फुटांखालील घरांची करमाफी पालिका का करत नाही, असा सवालही जगताप यांनी विचारला आहे.

मनसेकडून सेनेवर ताशेरे
रस्त्याच्या फूटपाथवर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून पैसे घेणाऱ्या खंडणीखोरांवर कारवाई करावी, याची मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो असलेली पावती देऊन फेरीवाल्यांकडून पैसे उकळण्याचा प्रकार गंभीर आहे, आणि हाप्रकार किती दिवस चालणार, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments