फेमस

आदर्श गावच्या भास्कर पेरे पाटलांवर झाला गुन्हा दाखल; कारण आहेत पत्रकार

ग्रामपंचायतमध्ये विकासकामे अशी करा की लोक स्वतःहून आपल्याकडे आले पाहिजे असे म्हणणारे आणि ग्रामपंचायतीत आपली कामगिरी बजावत संपूर्ण महाराष्ट्रात फेमस होणारे एकमेव सरपंच म्हणजे आदर्श गावचे भास्कर पेरे पाटील. विकास करूनदेखील गावकऱ्यांनी काही त्यांच्या पोरीला त्यांची खुर्ची मिळवून दिली नाही. मुलगी सरपंच पदाची निवडणूक हारली आणि कामाला देखील अपयश मिळू शकते याचे ज्वलंत उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. आता याच आदर्श गावच्या सरपंच भास्कर पेरे पाटलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्ह्याला कारण ठरले पत्रकार. ती वेळ होती (31 जानेवारीची) आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूकांची आणि आपल्या मुलीचा त्यावेळी पराभव पाहून नैराश्यातून पेरे पाटलांचा संयम सुटला आणि मोहा (जामखेड) ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहात एका कार्यक्रमाच्या भाषणात त्यांनी पत्रकारांना हलकट, हरामखोर अशा शिव्या देत अपमानित केले होते. याकारणास्तव त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे जामखेडमधील पत्रकार व्यथित झाले आणि या घटनेचा सर्व पत्रकारांनी एकत्र येत जाहीर निषेध केला होता. त्याबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मुलीच्या पराभवामुळे पेरे पाटील यांना मोठा धक्का बसला आणि नैराश्यातून त्यांनी माध्यम प्रतिनिधींना शिवीगाळ केली, असे पत्रकारांचे म्हणणे आहे.

आता विकासकामे करणारा ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात भास्कर पेरे पटलांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतले असताना निवडणूका येताच ते स्वतः उभे न राहता त्यांनी आपल्या मुलीला उभे केले होते. युवकांना संधी मिळाली पाहिजे असा यामागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले होते. पण मुलीला गावकऱ्यांनी डावलले आणि राजकीय वर्तुळात आश्चर्य चकित वातावरण निर्माण झाले. समाजसेवक अण्णा हजारे, तसेच आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनीही त्यांच्या मुलीच्या पराभवाबद्दल खेद व्यक्त केला होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments