कारण

Budget 2021: “आर्थिक थापा बंद करायला हव्यात”, छगन भुजबळांचा टोला

Union Budget 2021-22 च्या सादरीकरणानंतर केंद्र सरकार विरूद्ध आक्रोशात्मक कंमेंट्स, ट्विट्सचा पाऊस सोशल मीडियावर कोसळला.
सत्तेतील अनेक नेते विरोधक तज्ज्ञ आणि समाजातील इतर वर्गानेही आपले मत प्रसार माध्यमांवर मांडले आहे.

काही लोकांनी नवीन योजनांचे स्वागत केले, तर काहींनी गेल्या बजेट मधल्या अपुऱ्या वचनांची आठवण सरकारला करून दिली आहे. काहींनी खड्या शब्दात सरकारला सुनावलेदेखील आहे.

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, छगन भुजबळ यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मोदी सरकार बजेटमध्ये थापा मारत असल्याची टीकादेखील त्यांनी केली.

“खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, तसे हे दिल्लीतले बाजीराव आहेत.” केंद्रात चाललेल्या कारभारबद्दल मत मांडताना छगन भुजबळांचा हा आक्रोश दिसून आला.

“आर्थिक थापा बंद करा” बजेट सदारकरताना दाखवण्यात आलेली आकडेवारी खोटी असल्याचा टोला भुजबळांनी लगावला आहे आणि खरे आकडे हे 6 महिन्यानंतर जनतेला समजतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

नाशिक आणि नागपूरमध्ये भाजपची सत्ता असल्याने तिथे मेट्रोला निधी मिळाला, परंतू मुंबईही मेट्रो का अडकवून ठेवलीय? जमीन केंद्राची आहे म्हणतात, त्यांनी कुठुन मंगळावरून आणलीय का, असा सवालही छगन भुजबळांनी केला आहे.

दिल्लीत होणाऱ्या शेतकरी आंदोलनचा उल्लेख करत, ‘शेतकऱ्यांचं ऐका जरा. भांडवलदारांसाठी हे कायदे बनवलेत.’ असा टोला ही भुजबळांनी मोदी सरकारला सुनावला आहे.

काही राज्यांच्या निवडणुका जवळ आल्यासून त्यांसाठी निधी वाटप झाला आहे का, असा चिमटा काढणारा प्रश्नही भुजबळांनी विचारला आहे. सादर केलेले बजेट हे देशाचे की पक्षाचे असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे.

पेट्रोलच्या वाढत्या किमती पाहून “ पेट्रोल हजार रुपये करायचे असेल त्यांना.” असा टोला ही भुजबळांनी मोदी सरकारला लागावला आहे

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments