आपलं शहर

बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी मोठी बातमी, म्हाडाची घरे मिळणार?

इंग्रजांच्या काळात जेल म्हणून वापर करण्यात येत असलेल्या मुंबईतील बीडीडी चाळ कालांतराने घरांसाठी वापरली गेली. बीडीडी चाळींचा पुनर्विकास हा मुद्दा मागील अनेक वर्षे गाजत आहे. तुर्तास तरी या बिल्डिंगमधील रहिवासी यांना म्हाडाची चांगली घरे उपलब्ध होणार आहे. मुंबईतील अत्यंत महत्वाच्या अशा वरळी, नायगाव भागामधील चाळीत मराठी माणूस राहत आहे. बीडीडी चाळीतील 300 रहिवासी यांच्यासाठी म्हाडा लॉटरी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ह्यांच्या हस्ते काढण्यात आली. त्याचवेळी पर्यावरण मंत्री आणी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर , मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख देखील उपस्थित होते .

एक जानेवारी 2021 पर्यंत बीडीडी चाळीतील जे रहिवाशी या लॉटरीमध्ये लाभर्ती आहेत त्या रहिवाशांचे असे म्हणणे आहे की, सरकारचे काम पद्धतशीरपणे चालू आहे. लोकांना खात्री दिलेली आहे. त्यामुळे आम्ही सर्व ऍग्रिमेंट करणार आहोत. असं काही घाबरण्याचं कारण नाही. आम्हाला घर नंबर दिलेला आहे, त्या घर नंबर वरती त्या माणसाच्या नावाने ऍग्रिमेंट होईल आणि ते एग्रीमेंट सरकार आणि त्यांच्या मध्ये असेल त्याच्यामुळे विश्वासाचा प्रश्नच येत नाही साधारण एक दोन अडीच वर्षांमध्ये घर होतील

सगळे रहिवासी पात्र सरकार म्हणून सरकारचं काम पद्धतशीर पणाने चालू आहे लोकांना खात्री दिलेली आहे ऍग्रिमेंट केलेला आहे ऍग्रिमेंट करणार आहोत त्याच्यामुळे असं काही घाबरण्याचं जे कोणी घाबरवणारे आहेत ते चुकीचं पद्धत आणि एक अविश्वासाचा वातावरण निर्माण करू इच्छित आहेत आज आम्ही घर नंबर दिलेला आहे त्या घर नंबर वरती त्या माणसाच्या नावाने ऍग्रिमेंट होईल आणि ते ऍग्रिमेंट सरकार आणि त्यांच्या मध्ये असेल त्यामुळे अविश्वासाचा प्रश्नच येत नाही साधारण एक दोन अडीच वर्षांमध्ये घर होतील.

अनेक लोक बीडीडी चाळीत राहतात, मात्र त्या बीडीडी चाळी पाडण्याची वेळ आली. मात्र, प्रत्येक सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलय, महाविकास आघाडी सरकारने मात्र त्याकडे लक्ष दिलं आहे. मुंबईत आशा अनेक बीडीडी चाळी आहेत यामध्ये वर्षानुवर्षे मुंबईकर राहत आहेत. आजवर रखडलेला मुंबईतील आशा अनेक चाळींचा पुनर्विकास या सरकारच्या माध्यमातून होईल का? याकडे सर्व मुबंईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

(Big news for the residents of BDD Chawl, will they get MHADA houses?)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments