खूप काहीकारण

खळबळजनक; ‘बर्ड फ्लू’ ने घेरले पक्षांसोबत मानवाला देखील, थेट 7 जणांना बाधा

कोरोना संकटाच्या मधोमध राज्यात आणि देशांत “बर्ड फ्लू” या आजाराने त्याचे जाळे पसरवायला सुरुवात केली होती. कोरोना इतकाच भयंकर पण माणसाला होत नसलेला आजार अशी “बर्ड फ्लू” (Bird Flue) आजाराची आतापर्यंतची ओळख होती. पण आता त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तो आता खरोखरच माणसांमध्येही आढळू लागला आहे.

“बर्ड फ्लू” च्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यातील एका वेळेस हजारो कोंबड्याचा जीव घेण्यात आला होता. मुख्यतः बर्ड फ्लू हा आजार पक्षांच्या बाबतीतला असल्याचे चित्र आतापर्यंत आपण पाहिले. त्यामुळे अनेक पक्षांना या कारणामुळे जीव गमवावा लागला. पण आता आश्चर्यकारक घटना समोर आली असून सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रशियामध्ये तब्बल 7 जणांना बर्ड फ्लू चा संसर्ग झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. (Bird flu can infect 7 people directly, even in humans)

आतापर्यँर केवळ पक्षांपर्यंतच मर्यादित असलेल्या बर्ड फ्लू ने आपल्या जाळ्यात मानवाचा देखील समावेश करून घेतला आहे. याचे उदाहरण रशियामध्ये आढळून आले असून या विषाणूच्या “एच 5 एच 8” या प्रकारचा संसर्ग रशियातील एका कुक्कुट केंद्रावरील 7 जणांना झाला आहे व सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बर्ड फ्लू च्या विषाणूचा हा प्रकार रशिया, युरोप, चीन, आखाती देश आणि उत्तर आफ्रिकेत आढळून आला आहे.

रशियात काही दिवसांपूर्वी बर्ड फ्लू चा मानवामध्ये संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र खात्रीसाठी चाचणी केली असता मानवामध्ये देखील बर्ड फ्लू चा संसर्ग होत असल्याचे जाहीर करण्यात आले. यावर जागतिक आरोग्य संघटना (WHO) असे सांगते की, पक्ष्यांकडून मानवामध्ये बर्ड फ्लू चा संसर्ग जरी होत असला, तरी संसर्ग बाधित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होत असल्याचे कोणतेही उदाहरण नाही. म्हणजे बर्ड फ्लू हा आजर कोरोनासारखा संसर्ग करणारा नाही. त्यामुळे याचा धोका किंचित कमी असावा, पण योग्य खबरदारी घेणे सध्या गरज बनली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments