कारणखूप काही

ठाणेकरांसाठी खुषखबर, पालकमंत्र्यांच्या वाढदिनी खास सुविधा

आज ठाण्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ठाणेकरांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर सुरु करण्यात आले आहे. पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची पुरेपूर जवाबदारी घेतली उचलली आहे. आज ठाणेकरांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून ठाणेकरांप्रती असलेली आपुलकी दर्शवली आहे. (birthday of cabinet minister Eknath Shinde)

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात विविध OPD ची व्यवस्था करण्यात आली होती. यात जनरल OPD, नेत्ररोग तपासणी, कॅन्सर OPD आणि मोफत औषध वाटप या सुविधा पुरवण्यात आल्या आहे.

तसेच 10 रुग्णवाहिकांचे ही वाटप करण्यात आले. तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे फॉउंडेशन अंतर्गत नेत्र तपासणी सह मोफत चष्मा वाटपही केले गेले.
ठाण्यातील बरीच नेते मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होती. ठाणेकरांनी सुद्धा या शिबिरास उपस्थित राहून या सेवांचा फायदा करून घेतला.

ठाणेकरांचे आरोग्य ही आपली जवाबदारी मानून पालकमंत्री म्हणून श्री एकनाथ शिंदे आपली जवाबदारी योग्य रित्या पार पडत आहेत. अशाच प्रकारच्या सेवा याही पुढे ठाणेकरांना अनुभवायला मिळतील हीच आशा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments