कारण

पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करण्याचं आश्वासन देऊन भाजपने केंद्रात सत्ता आणली – उदय सामंत

कॅबीनेट मंत्री उदय सामंत यांनी इंधन दरवाढी बाबत आपले मत मांडले आहे. उदय सामंत म्हणतात की, केंद्र सरकारने अच्छे दिनाचा वादा केला होता. प्रत्यक्षात मात्र जनतेला बुरे दिन दाखवत आहेत.

पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करण्याचं आश्वासन देऊन भाजपने केंद्रात सत्ता आणली. किती अच्छे दिन आले सर्वांनाच माहित आहे. पण आता इंधनाचे दरववाढ झाल्याने सर्वसामान्यांवर परिणाम होतोय. इंधन दरवाढ ही सामान्य जनतेला परवडणारी नाही.

म्हणून पक्षप्रमुखांच्या आदेशाने आज सेना इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करत आहेत. इंधन दरवाढीवर सेना आंदोलन करत आहेत, म्हणून भाजप काही तरी वीज तोडणी विरोधात आंदोलन करत आहे.

काल नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपद कोणाकडे जाणार? हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील. त्यांचा निर्णय सर्व शिवसैनीकांसाठी अंतिम असेल. असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

(BJP brought power to the center by promising to reduce petrol, diesel and gas prices – Uday Samant)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments