कारण

भाजप इन ॲक्शन मोड; पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार तयारी

गेल्या विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपचा जवळपास 25 वर्षांचा संसार मोडला. तो संसार मोडल्यानंतर एक नवीन प्रयोग संपूर्ण राज्याने पाहिला तो म्हणजे “महाविकास आघाडी”. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन वेगवेगळ्या विचारधारांच्या पक्षांचे हे “एक” सरकार. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार लवकरच पडेल आणि त्याजागी भक्कम असे भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेत येणार, अशी भविष्यवाणी सातत्याने केली जात आहे.

महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने आता आपला पक्ष मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. मुंबई नजीकच असलेल्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे भारतीय जनता पक्षाकडून बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय संघटन मंत्री आणि त्यासोबत 40 नेते सहभागी झाले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटिल, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे राधाकृष्ण विखे पाटिल यांव्यतिरिक्त भाजपचे प्रमुख नेते मंडळी या बैठकीत सहभागी झाले होते.

या 2 मुद्द्यांवर भाजप लक्ष देणार
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात भाजप आणखी मजबूत करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, राज्यातील ओबीसी समाजापर्यंत पोहोचण्याचा निर्धार यावेळी झाला आणि राज्यातील युथ पॉवरला आपल्याकडे खेचायचे असे दोन कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.

लवकरच ओबीसी आरक्षण हक्क परिषद
महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत गंभीर नाहीत असा वेळोवेळी भाजपकडून आरोप केला जातो. हाच मुद्दा समोर ठेवून राज्याती ओबीसींच्या हक्कासाठी जवळपास 36 जिल्ह्यांत भाजपकडून “ओबीसी आरक्षण हक्क परिषद” घेण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली.

याशिवाय, युवकांना आकर्षित करण्यासाठी पक्षातर्फे आता “युवा वॉरियर” नावाचे एक अभियान चालवले जाणार आहे. त्यामुळे, मागील वेळी हातामध्ये आलेली संधी गेल्यानंतर आता मात्र भाजपने सत्तेत पुन्हा येण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments