कारण

भाजपला गळती; आमदारकीची हॅटट्रिक करणारा नेता शिवसेनेत

मुंबई पालिकेची निवडणूक जवळ येताच शिवसेनेने कंबर कसली आहे. भाजप, मनसेचे अनेक बडे नेते फोडण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांच्यासह आता बोरिवलीतील भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता (Hemendra Mehata) यांनी आपल्या हातावर शिवबंधन बांधून घेतलं आहे. (BJP leader Hemendra Mehta joined Shiv Sena)

सध्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीचं वार जोरात वाहू लागले आहे. सर्व पक्षांनी आतापासूनच आपली पक्षबंधानी सुरू केली आहे. त्यात शिवसेनेने अनेक विभागातील बडे नेते अपल्याकडे घेण्याचा सपाटा लावला आहे, त्यामुळे मनसेसह राज्यातील मोठा पक्ष असलेल्या भाजपलाही अनेक धक्के बसू लागले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवास वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश झाला. यावेळी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.

कोण आहेत हेमेंद्र मेहता?
भाजपचे बंडखोर आमदार आणि अनेक गुजराती नागरिकांचे संघटक म्हणून हेमेंद्र मेहता यांनी ओळख आहे. त्यामुळे ते शिवसेनेत येताच त्यांचा चांगला फायदा शिवसेनेला होऊ शकतो.

हेमेंद्र मेहता हे बोरिवली पश्चिममधून 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.भाजपकडून गोपाळ शेट्टींना उमेदवारी मिळाल्यानंतर हेमेंद्र मेहता यांनी बंडखोरी केली होती. त्यावेळेस त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तिथं न जमल्याने ते पुन्हा भाजपवासी झाले. अखेर त्यांनी भाजपला कंटाळून शिवसेनेची वाट धरली आहे.

हेगडे, शेंडेंच्या हाती शिवबंधान
मुंबईतल्या विलेपार्लेतील भाजप आणि मनसेच्या बड्या नेत्यांना शिवसेनेने आपल्यात सामील करून घेतलं आहे. विलेपार्लेतील माजी आमदार आणि भाजपचे नेते कृष्णा हेगडे (BJP leader Krishna Hegde) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबरच 2019 च्या विलेपार्ले विधानसभेतील मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे (MNS candidate Juili Shende) यांनीही हातावर शिवबंधन बांधलं आहे. शुक्रवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी हा पक्षप्रवेश झाल्यानंतर लगेचच हेमेंद्र मेहातांनी हातावर शिवबंधन बांधून घेतलं आहे.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments