कारण

रात्रीस खेळ चाले, विलेपार्लेतील मनसेसह भाजपचे बडे नेते शिवसेनेत

महापालिका निवडणूक जवळ येत असताना अनेक पक्षांतरे होत असलेली पाहायला मिळत आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला मोठं खिंडार पडल्यानंतर (Rajesh Kadam from Kalyan joins Shiv Sena) शिवसेनेने आपला मोर्चा मुंबईचे वळवला आहे. (BJP leaders in Shiv Sena along with MNS)

मुंबईतल्या विलेपार्लेतील भाजप आणि मनसेच्या बड्या नेत्यांना शिवसेनेने आपल्यात सामील करून घेतलं आहे. विलेपार्लेतील माजी आमदार आणि भाजपचे नेते कृष्णा हेगडे (BJP leader Krishna Hegde) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबरच 2019 च्या विलेपार्ले विधानसभेतील मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे (MNS candidate Juili Shende) यांनीही हातावर शिवबंधन बांधलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. यावेळी परिवाहन मंत्री, विभाग प्रमुख अनिल परब (Transport Minister, Head of Department Anil Parab) युवासेना सचिव वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्याश अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

कोण आहेत कृष्णा हेगडे?
कृष्णा हेगडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी त्यांची काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख होती. 2009 साली कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विलेपार्लेतून आमदारकी जिंकली होती, मात्र 2014 मध्ये भाजपच्या पराग अळवणी यांनी त्यांचा पराभव केला.


 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments