कारण

BMC Election : सेनेच्या पक्षफोडीनंतर भाजपच्या हळदी कुंकू समारंभांना सुरुवात

मुंबई महानगर पालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election) जवळ आल्यानंतर अनेक पक्ष आपल्या पक्ष संघटनसाठी आणि वाढीसाठी कामाला लागले आहेत. शिवसेनेने विरोधी पक्षातील अनेकांच्या हाती शिवबंधन बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपनेही आपला पक्षवाढीचा प्रयत्न सुरु केला आहे. (BJP starts turmeric kumkum programs)

भाजपच्या महाराष्ट्रच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी महिलांची ताकद एकवटण्यासाठी सुरुवात केली आहे. गोरेगाव येथे एका हळदी कुंकूच्या समारंभात त्या सहभागी झाल्या होत्या. गोरेगावच्या वार्ड क्र. 52 च्या नगरसेविका प्रीती साटम यांनी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने स्थानिक महिलांनी या समारंभात उपस्थिती दर्शवली होती.

येणारी मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation Election) निवडणूक एकट्या भाजप विरुद्ध सगळे अशी लढण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी मविआ एकत्र येण्याची दाट शक्यता राजकीय वर्तूळात सुरु आहे, त्या पर्शवभूमीवर आता माहिला मतदारांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी हळद कुंकू सारखे समारंभ एक योग्य प्लॅटफॉर्म ठरु शकतो, हे गमक भाजपने साधलं आहे, त्यामुळेच मुंबई पालिकेच्या विजयासाठी भाजपने अशा कार्यक्रमांना सुरुवात केली आहे.

कल्याण-डोंबिवलीतील मनसेचे धडाडीचे कार्यकर्ते राजेश कदम, भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे, हेमेंद्र मेहता अशा अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे, भविष्यात भाजप, मनसेतील अनेक बडे नेते सेनेच्या वाटेवर असल्याचेही म्हटले जात आहे, त्यामुळे येत्या काळात मुंबई पालिकेवर झेंडा फडकवण्यााठी सर्व पक्ष काय कामगिरी करतात, हे पाहणे गरजेचे असेल. (BJP starts turmeric kumkum programs)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments