आपलं शहर

BMC Budget 2021 : कोरोनामुळे BMC ला जाग, बजेटमध्ये आरोग्य विभागाला मोठा निधी

देशाची आर्थिक राजधानी आणि देशातील सगळ्यात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचा 2021-22 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

करोना महामारीशी लढत असताना मुंबई महापालिकेने नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा पुरविल्या. महामारीच्या या कठीण काळात कमीवेळात महापालिकेने कोरोनाबाधीतांना आरोग्य सुविधा पुरविल्या.

महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी सुधारित अर्थसंकल्पात 780.69 कोटी, तर अर्थसंकल्पीय अंदाजात 1206.14 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी 822.72 कोटींची दुरूस्तीच्या कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्य क्षेत्रासाठी काय आहे या अर्थसंकल्पात?
> सायन, KEM, नायर रुग्णालयांमध्ये सिटी स्कॅनची सुविधा पुरविण्यासाठी 8 ते 10 कोटींची तरतूद
> वैद्यकीय महाविद्यालये आणि काही प्रमुख रुग्णालयांतील यंत्रसामग्रीसाठी 96 कोटी
> ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती, इत्यादी व्यक्तींना घरच्या घरी ओपीडी ऑन व्हील (OPD on Wheel) या योजनेंतर्गत आरोग्य सेवा देण्याकरीता मोबाईल व्हॅन देणार
> डेंग्यू, मलेरिया, क्षयरोग, लेप्टो, एड्स या संसर्गजन्य रोगांगसाठी 2030 पर्यंत 100 टक्के लसीकरण करण्याचे टार्गेट
> संसर्गजन्य रोगांचा सामना करण्याहेतूने कस्तुरबा रुग्णालयाची क्षमता वाढविण्यासाठी एक नवीन इमारत
> सर्व नर्सिंग स्कूल नर्सिंग कॉलेजात परावर्तित करण्यासाठी 20 कोटींची तरतूद

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments