आपलं शहर

BMC budget 2021 : BEST चा प्रवास खाजगीकरणाच्या दिशेने, पालिकेच्या बजेटकडे मुंबईकरांचे लक्ष

कोरोनामुळे आर्थिक स्थिती डगमगलेल्या मुबंई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाकडे सर्वच मुबंईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. मालमत्ता कर, विकास नियोजन शुल्क तसेच इतर अधिक महत्वाचे आर्थिक स्रोत खालावले आहेत. यामधील एक सर्वात महत्वाचा स्रोत म्हणजे ‘बेस्ट’.

आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात बेस्टच्या वाट्याला काय येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट आर्थिक दृष्ट्या तोट्यात आहे. बेस्ट कामगारांचे पगारही वेळेवर होत नाहीत.

बेस्टवर सध्या 700 कोटींचे कर्ज असून, सध्याचा बेस्टच्या दैनंदिन खर्चही दुप्पट आहे. पालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाल्यामुळे बेस्टला मिळणारा निधी हा मर्यादित स्वरूपाचा असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

2021-22 या वर्षीच्या अर्थसंकल्पात 1,887 कोटी 73 लाख इतकी तूट नोंदवण्यात अली आहे. कोरोना संकटामुळे बेस्टच्या उत्पन्नात घट झाली. या सर्व पार्श्वभूमीवर भविष्यात बेस्टचा गाडा कसा हाकला जाणार याविषयीची चिंता व्यक्त केली जात आहे. आजच्या अर्थसंकल्पातून बेस्टच्या वाट्याला काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

(BMC budget 2021: BEST's journey towards privatization,
 Mumbaikars focus on municipal budget)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments