कारणखूप काही

मुंबई महापालिकेच्या शाळांची नाव बदलणार ! : या आहेत शिक्षण विभागासाठी च्या नवीन तरतुदी

मुंबई  महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या वेळी मुंबई महापालिकेने एक नवीन निर्णय घेतला आहे. यानुसार मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांची नावं बदलून मुंबई पब्लिक स्कूल करण्यात येणार आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणजेच मुंबई महापालिकेचे  2021-22 चे अर्थसंकल्प आज जाहीर करण्यात आले आहे. ह्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागाचे ह्या वर्षीचे बजेट २,९४५ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. 

शिक्षण विभागासाठी घेण्यात आलेले महत्वाचे मुद्दे : 

शिक्षण विभागासाठी 2,945 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही  अनेक नवीन योजना देखील राबवण्यात येणार आहेत. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आता सांईटीझर, साबण देण्यात येणार आहे. तसेच अन्य 19 आरोग्य विषयक अत्यावश्यक साधनांच्या पुरवठ्यासाठी देखील  15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

नवीन 24 माध्यमिक शाळांचा शुभारंभ: 

मुंबई महापालिकेने नवीन दहा सीबीएसई शाळा सुरु करण्यासाठी ही पैश्यांची तरतूद केली आहे. मुंबई शहरात २, पूर्व उपनगरात 5, तर पश्चिम उपनगरात 3 अश्या एकूण 10 शाळांच्या निर्मितीचा ध्यास मुंबई महापालिकेने घेतला आहे. 

 खासगी शाळांच्या अनुदानासाठी 380 कोटी तसेच मोफत वस्तू पुरवठ्या साठी 88 कोटींची तरतूद आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर कॉंसिलिंग कार्यक्रमचा उपक्रम WhatsApp आणि Chat bot द्वारे राबविण्यात येणार आहे.

 ‘करियर टेन लॅब’ या संस्थेमार्फत वैयक्तिक मार्गदर्शनाचा  उपक्रम मे 2021 पासून सुरु करण्यात येणार आहे. हा उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. या बजेटमध्ये  20.10 लाखांची तरतूद केली गेली आहे. तसेच 1300 वर्गखोल्या असणारा डिजिटल क्लासरूम मुंबई महापालिका शाळांमध्ये असणार असून ह्यासाठी 28.58 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.    

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments