आपलं शहर

32 हॉटेल, पब रेस्टॉरंट, मंगलकार्यालयांवर कारवाई, BMC अॅक्शन मोडमध्ये

गेल्याा काही दिवसात मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, ही वाढ रोखण्यासाठी आणि कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पालिकेने कंबर कसली आहे. ((Mumbai Municipal Corporation’s action on 32 hotels, pubs, restaurants)

कोरोनाची वाढती संख्या पाहता मुंबई महानगरपालिका अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. अंधेरी वेस्टमधील 32 हॉटेल, इतर पब रेस्टॉरंट आणि मंगलकार्यालयांना पालिकेने नोटीस पाठवली आहे. कोरोना संदर्भातले नियम तोडल्यास थेट कारवाई करणार असल्याच्या सुचनादेखील देण्यात आल्या आहेत.

रेस्टॉरंट, पब, मंगलकार्यालयांमध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळणं बंधनकारक असेल, हॉटेलमध्ये होणारी गर्दी टाळावी, त्याचबरोबर वाढत्या कोरोना रुग्णांना लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आदेश बीएमसीकडून देण्यात आले आहेत.

ताकीद देऊन ही कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधीत मालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मोठ्या कारवाईमध्ये हॉटेल, पब रेस्टॉरंट, मंगलकार्यालये किंवा इतर आस्थापनांना सील केलं, जाईल, अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे.

मुंबईत रुग्ण वाढले
मुंबईत काल (19 फेब्रुवारी रोजी) 823 कोरोना रुग्ण सापडल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. चेंबूरमधील चार इमारती पालिकेकडून सील करण्यात आल्या आहेत. संबंधीत इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याने या इमारती 14 दिवसांसाठी सील करण्यात आल्यात.

या इमारतींमधील नागरिकांना वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन जेवण मागवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चेंबूरमध्ये वारंवार रुग्णसंख्या वाढत असल्याने बीएमसीने या भागाकडे विशेष लक्ष दिलं आहे. (Mumbai Municipal Corporation’s action on 32 hotels, pubs, restaurants)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments