खूप काही

Budget 2021 : ‘बजेट कसं नसावं’ हे आज दिसलं, बाळासाहेब थोरतांचा टोला

Union Budget 2021 च्या सादरीकरणानंतर केंद्र सरकार विरुद्ध कमेंट्स, पोस्ट्स आणि ट्विट्सचा पाऊस सोशल मीडियावर झाला. अनेक नेते, विरोधक आणि जनतेने आपले मत सोशल मीडियावर जाहीर केले. काही लोकांनी बजेटचे स्वागत केले तर काही लोकांनी विरोध केला.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनीही बजेटवर आपली भूमिका मांडली आहे. बजेट कस नसावं, हे आजच्या बजेटवरून दिसलं, हे आत्मनिर्भरतेच प्रतिक आहे का? देश बिकने नही दुंगा, असं पंतप्रधान मोदी म्हणायचे, पण ते खोटं बोलत होते. यांनी देश विकायला काढलाय, बेरोजगारांना नोकरी देणारी कोणतीही घोषणा या बजेटमध्ये केली नाही. कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी काहीच केलं नाही. देश म्हणून हा अर्थसंकल्प हवा होता, मात्र काही राज्याच्या निवडणुका जिंकण्यासाठी या बजेटमध्ये तरतुद करण्यात आली आहे, हा अर्थसंकल्प निराश करणार आहे,अशी जोरदार टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील घोषणांवर निराशा व्यक्त करताना बाळासाहेब थोरत म्हणाले की ”नाशिक मेट्रोसाठी निधी दिला, पण तो अपुरा आहे. महाराष्ट्रासाठी काहीच दिसत नाही. कृषी कर्जाची मर्यादा दरवर्षी वाढवावी लागते, दरवर्षी त्यात नवं काही नाही. शेतकर्‍यांना काय दिलासा दिलाय, तो दिसतं नाही.महाराष्ट्र सर्वात जास्त कर केंद्राला देतो, मात्र महाराष्ट्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी चांगली नाही. सगळ्यात जास्त जीएसटी राज्य देते, मात्र त्याचे पैसेही केंद्राकडे प्रलंबित आहेत. मुंबईतून सगळ्यात जास्त जीएसटी गोळा होतो, मात्र मुंबईलाही काही दिलेलं नाही, अशीही माहिती बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

बजेट 2021-22 वर निराशा व्यक्त करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की “पेट्रोलच्या दराची सेंच्युरी होणार आहे. पूर्वी पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन करणारे आता कुठे आहेत? त्यांनी अधिभार वाढवायचे आणि आम्ही कमी करायचे हे कसं होणार, राज्याची आर्थिक गणितं असतात. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना आपल्या देशात किंमती का वाढवल्या जात आहेत? असा सवालही थोरात यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments